Pune : उठसूट कोणीही पाळणाघर काढायला आता बसणार आळा; महापालिकेकडे नोंदणी बंधनकारक

एमपीसी न्यूज – पुणे शहरात उठसूट कोणीही पाळणाघर काढतो. 2 – 4 खेळणी, खेळाचे साहित्य, घसरगुंडीची व्यवस्था करून, जाहिराती करून पाळणाघर काढतो. त्याला आता आळा बसणार आहे. शासनाने राष्ट्रीय पाळणाघर योजना सुरू केली आहे. त्यामध्ये काही निकष ठरविलेले आहेत. पाळणाघरांत ‘सीसीटीव्ही’ लावावे. पुणे शहरात पाळणाघर सुरू करताना पुणे महापालिकेची परवानगी आवश्यक लागणार आहेत.

पाळणाघरांचे काही निकष ठरवून देण्यात आले आहेत. त्यामध्ये पालकांचे कॉन्टॅक्ट द्यावेत, काही पालकांना मुलांना घ्यायला  येण्यास जमत नसेल तर पाळणाघर चालकांनी आम्ही हा हा माणूस मुलाला घरी घेऊन येण्यास पाठवीत आहे, अशी ओळख पटवून द्यायची आहे, अशी माहिती नागरवस्ती विभागाचे उपायुक्त सुनील इंदलकर यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली.

पुणे शहरात आज जीवघेण्या महागाईच्या स्पर्धेत पती आणि पत्नी दोघेही नोकरी करतात. त्यामुळे चिमुकल्यांना सांभाळण्यासाठी पाळणार हे उत्तम समजले जातात. अशा पालकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.