Intranasal Covid vaccine : भारत बायोटेकच्या इन्ट्रानेसल कोविड लसीच्या वापराला मंजुरी

एमपीसी न्यूज : कोरोना प्रतिबंधक लसीकरण सध्या देशात वेगाने सुरू आहे. लसीच्या पहिल्या दोन मात्रांसह बुस्टर डोसही सध्या देशात दिला जात आहे. (Intranasal Covid vaccine) अशातच आता बहुप्रतिक्षित नाकावाटे दिली जाणारी लस तयार झाली आहे. या लसीच्या वापरालाही परवानगी देण्यात आली आहे.

भारत बायोटेकला DCGI कडून नाकावाटे दिल्या जाणाऱ्या कोविड 19 लसीच्या आपत्कालीन वापराची परवानगी मिळाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविय यांनी दिली आहे. नाकावाटे दिली जाणारी ही भारतातली पहिली कोरोना प्रतिबंधक लस असेल.

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मंडविया यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. कोरोनाविरोधात भारताच्या लढाईला मोठे बळ मिळाले असल्याचे ट्वीट त्यांनी केले. भारत बायोटेकच्या ChAd36-SARS-CoV-S COVID-19 नेझल वॅक्सिनला आपात्कालीन वापरासाठी मंजुरी देत असल्याचे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले.(Intranasal covid vaccine) नेझल वॅक्सिनला देण्यात आलेली मंजुरी ही कोरोना महासाथीच्या विरोधातील आपल्या सामुहिक लढाईला आणखी मजबूत करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कशी असते ही लस?

इतर लसी दंडात दिल्या जातात. यामध्ये औषध स्नायूंमध्ये जाणं गरजेचं असतं. मात्र ही नवी लस स्नायूत देण्याची गरज नाही. नाकामध्ये दोन ते तीन थेंब टाकून ही लस देण्यात येते.(Intranasal Covid vaccine) नाक चोंदल्यास आपण जो स्प्रे वापरतो, त्याप्रमाणेच ही लस देता येणार आहे. भारत बायोटेकने घेतलेल्या चाचण्यांमध्ये या लसीचे कोणतेही साईड इफेक्ट्स आढळून आले नाहीत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.