Alandi : आळंदी देवाची येथे श्रीराम कथेचे आयोजन

एमपीसी न्यूज – चैतन्य गोशाळा ट्रस्ट तर्फे आळंदी देवाची (Alandi) येथे आठ दिवस श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 10 ते 18 सप्टेंबर कालावधीत मुंबई फ्रुटवाले धर्मशाळा प्रदक्षिणा रोड, येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

ही श्रीराम कथा ही तुलसी रामायण या ग्रंथावर आधारित असणार आहे. कथेचे निरूपण रवींद्र पाठक करणार आहेत. पाठक हे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे अनुग्रहित आहेत व गेले एक दशक सातत्याने श्रीरामचरितमानस या ग्रंथाचे नित्य कथा निरुपण देशविदेशात करत आहेत.

Photography Competition : अमृत महोत्सवानिमित्त फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन

या कथा निरुपणाचा कार्यक्रम 10 सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडे पाच ते साडे आठ असा होणार असून 11 ते 17 सप्टेंबर सकाळी 9 ते 12 व संध्याकाळी साडे पाच ते साडे आठ असे असेल तर 18 सप्टेंबर रोजी कथेचा विराम दिवस असून सकाळी 9 ते 12 या कालावधीत तो पार (Alandi) पडणार आहे. यावेळी निवासस्थानाची सुविधा असून वैकल्पिक निवास व्यवस्था आळंदी येथे सशुल्क उपलब्ध आहे. तसेच, कथास्थळी निशुल्क भोजन प्रसाद व्यवस्था उपलब्ध केली जाणार आहे. मात्र, त्यासाठी पूर्व नोंदणी आवश्यक असल्याची माहिती, चैतन्य गोशाळा ट्रस्ट तर्फे देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.