Photography Competition : अमृत महोत्सवानिमित्त फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन

एमपीसी न्यूज : युवक कल्याण मंत्रालय भारत सरकार, नेहरू युवा केंद्र पुणे व देवदत्त फोटोग्राफी स्कूल चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त फोटोग्राफी स्पर्धेचे (Photography Competition) आयोजन करण्यात आले आहे.जिल्हा स्तर, राज्य स्तर व देशपातळीवर अशा टप्याने स्पर्धेचे नियोजन करण्यात आले आहे.

ग्रामीण तसेच शहरी भागातील फोटोग्राफर्सना  स्वतःला सिद्ध करण्यासाठी हि एक उत्तम संधी आहे. देशपातळीवर सर्वत्र  असे नियोजन होणार असून पुणे जिल्ह्यामध्ये युवक कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्या तर्फे नियोजन व निवड याबाबतची जबाबदारी देवदत्त फोटोग्राफी स्कूल चिंचवड यांना देण्यात आली आहे .

प्रोफेशनल फोटोग्राफर ते मोबाईल फोटोग्राफर यापैकी कुणीही स्पर्धेत भाग घेऊ शकते. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी  वय वर्षे 18 ते वय वर्षे  29 अशी वयोमर्यादा आहे.(Photography competition) स्पर्धेसाठी खालील विषयातच फोटो ची सॉफ्ट कॉपी पाठवायची आहे. फूड  फोटोग्राफी, पोर्ट्रेट, स्ट्रीट, लँडस्केप, वाईल्ड लाईफ, आर्किटेक्चर यापैकी कोणत्याही किंवा सर्व विषयात स्पर्धक एंट्री पाठवू शकतात.फोटोची सॉफ्ट कॉपी [email protected] या मेल आय डी वर स्वीकारली जाईल.

Chinchwad Burglary : वाल्हेकर वाडीत 71 हजारांची घरफोडी

याच मेल मध्ये स्पर्धाकाचे पूर्ण नाव. व आधार कार्डचा फोटो असणे आवश्यक आहे.  तसेच स्वतः चा मोबाईल क्रमांक पण असणे आवश्यक आहे, तरच फोटो ग्राह्य धरला जाईल.(Photography Competition) स्पर्धेकाचे वय 18 ते 29 यामध्ये असणे आवश्यक आहे. मेल वर  स्पर्धेसाठी फोटो दिनांक 15 सप्टेंबर 2022 पूर्वी पाठवणे आवश्यक असेल. त्यानंतर आलेले फोटो घेतले जाणार नाहीत. मोबाईल वर काढलेले फोटो सुद्धा चालणार आहेत

नेहरू युवा केंद्र, भारत  सरकार  व देवदत्त फोटोग्राफी स्कूल  यांच्याकडे  स्पर्धेचे सर्व अधिकार राखून ठेवले आहेत.  प्रथम, द्वितीय, तृतीय अशा विजेत्या स्पर्धकांना भारत सरकार युवक कल्याण मंत्रालय नेहरू युवा केंद्र पुणे यांचे बोधचिन्ह  असलेले प्रशस्तीपत्र, व स्मृतिचिन्ह  समारंभ पूर्वक पुण्यात प्रदान करण्यात येईल.(Photography Competition) अधिक माहिती साठी 9822946329  या मोबाईल क्रमांकावर  संपर्क साधावा असे आवाहन देवदत्त फोटोग्राफी स्कूल चे संचालक देवदत्त कशाळीकर यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.