Chandannagar Police : पुण्यात दुकानाचे शटर उचकटून चोऱ्या करणाऱ्या सराईतांना बेड्या

एमपीसी न्यूज – पुणे परिसरातील दुकानांचे शटर उचकटून चोऱ्या करत धुमाकुळ घालणाऱ्या दोन सराईतांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई चंदननगर पोलिसांनी (Chandannagar Police) 31 ऑगस्ट रोजी केली.

गणेश दगडू शिंदे (वय 30 रा. काळेवाडी), यश सर्जेराव खवळे (वय 19 रा. पिंपरी) यांना अटक केली असून त्यांचे दोन अल्पवयीन साथीदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Intranasal Covid vaccine : भारत बायोटेकच्या इन्ट्रानेसल कोविड लसीच्या वापराला मंजुरी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदननगर परिसरात (Chandannagar Police) गस्त घालत असताना पोलिसांना खबर मिळाली की, निळ्या रंगाच्या कारमध्ये चार ते पाच जण परिसरात संशयीत रित्या फिरत आहेत. पोलिसांनी सापळा रचून गाडीला आडविण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी गाडी थांबवली नाही. पोलिसांनी पाठलाग केला, यावेळी पोलीस अंमलदार सुभाष आव्हाड व नामदेव गडदरे यांनी झडप घेत आरोपींना अडवले. यावेळी पोलीस पथकाने आरोपींना ताब्यात घेतले.

पोलिसांनी त्यांच्याकडे अधिक तपास केला असता, बँकेच्या एटीएमवर दरोडा टाकण्यासाठी ते आल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्याकडून पोलिसांनी 1 चारचाकी, 2 दुचाकी, लोखंडी कोयता, कटावणी, लोखंडी कटर, दोन मोबाईल, एक बॅटरी, मिरचीपूड, नायलॉनची दोरी असा एकूण 2 लाख 15 हजार 390 रुपयांचा ऐवज जप्त केला. आरोपी यांच्यावर 8 गुन्हे दाखल असून 2 गुन्हे समर्थ पोलीस ठाणे, 1 विमातळ पोलीस ठाणे तर 1 लोणीकंद पोलीस ठाणे तर 4 चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.