Pune News : मीनाताई ठाकरे रुग्णालयात डायलेसिस केंद्र सुरु करण्यास मान्यता

एमपीसी न्यूज : कोंढवा पुणे महापालिकेच्या मीनाताई ठाकरे रुग्णालयात न्यू ग्लोबल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने 10 खाटांचे डायलेसिस केंद्र पी. पी. पी. तत्वावर सुरू करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, ‘शहरातील मधुमेह आणि हृदयरोगाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. किडनीचे आजार वाढत असून, त्याचा परिणाम रुग्णांचे मूत्रपिंड निकामी होण्यात होतो. या रुग्णांना डायलेसिसचे उपचार घ्यावे लागतात. हे उपचार महागडे असतात. ते सर्वसामान्य रुग्णांना परवडत नाहीत.

त्यामुळे मीनाताई ठाकरे रुग्णालयात डायलेसिस केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रति डायलेसिस 357 रुपये दर आकारण्यात येणार आहे. हा प्रकल्प दहा वर्षांच्या मुदतीच्या कराराने चालविण्यासाठी आवश्यक तो करार करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.