Hinjewadi news: वेश्या व्यवसाय करवुन घेणाऱ्या 2 आरोपींना अटक आणि चार पिडीत मुलींची सुटका

एमपीसी न्यूज : अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने वेश्याव्यवसाय करवुन घेणाऱ्या 2 आरोपींना अटक केली असून चार पिढीत मुलींची सुटका केली आहे.
ऋषिकेश पांगारे, वय 24 वर्षे, रा. बालेवाडी स्टेडियम, स्विमिंग पूल समोर, हिंजवडी पुणे मूळ पत्ता डी. बी. पवार चौ, सम्राट अशोक चौक, रमाबाई कॉलनी घाटकोपर, मुंबई, पूजा उर्फ प्रिया कुचेकर व 32 वर्षे रा श्रीनिवास संकुल सोसायटी, रायगड कॉलनी न्यू अहिरे गाव, वारजे माळवाडी, पुणे या दोघा आरोपींना अटक  करण्यात आले आहे.
त्यांच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यामध्ये भादवी कलम 370 (3), 34 सह अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 चे कलम चार-पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हिंजवडी पोलीस ठाणे करीत आहे. त्यांची 11 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये करण्याच्या अनुषंगाने माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे त्याप्रमाणे अनैतिक मानवी वाहतूक विभाग पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये वेश्या व्यवसाय करण्याच्या अनुषंगाने गोपनीय माहिती काढत असताना 7 ऑक्टोबर रोजी प्रिया उर्फ पूजा असे नाव सांगून मोबाईल कॉल करून, त्या नंबर वरून मुलींचे व्हाट्सअप द्वारे फोटो पाठवून मुलींची निवड करण्यास सांगून वाकड, हिंजवडी तिच्या साथीदाराच्या मदतीने, त्याच्या लाल रंगाच्या स्विफ्ट कारने हॉटेल लॉज फार्म हाऊस या ठिकाणी मुलींना सोडून मुलींकडून वेश्याव्यवसाय करून घेतात. अशी माहिती मिळाली होती.
अशा मिळालेल्या माहितीवरून ही सगळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कस्तुरी चौक, संत तुकाराम मंगल कार्यालयासमोर सार्वजनिक रोडवर बनावट ग्राहकास  पाचारण करून, पडताळणी करून, सापळा रचून, छापा टाकून लाल रंगाचे स्विफ्ट कार मधून एक आरोपी ताब्यात घेतला. त्याच्या दाबातील लाल रंगाची स्विफ्ट कार्बन चार पिढीत मुलींची वेश्या व्यवसायातून सुटका करण्यात आली असून पीडित मुलींपैकी एक उत्तर प्रदेश तीन महाराष्ट्रातील आहेत.
आरोपीच्या ताब्यातून 3,000 रुपये रोख रक्कम, 100 रुपये किमतीचे साहित्य, 9000 रुपये किमतीचा एक मोबाईल फोन, 400 रुपये किमतीचा एक पेन ड्राईव्ह  व सहा लाख रुपये किमतीची स्विफ्ट कार, असा एकूण 6.12 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल मिळाला आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) डॉ. काकासाहेब डोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉक्टर प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक (श्रेणी) विजय कांबळे, पोलीस आमदार कल्याण महानगर सुनील शिरसाठ, सुधा टोके, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, भगवंता मुठे, संगीता जाधव, रेश्मा झावरे, सोनाली माने यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.