Crime News : जुन्या भांडणाचा राग धरून दोन जणांना मारहाण करणाऱ्या दोघांस अटक

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाचा राग धरून दोन जणांना मारहाण करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत बिरेंदर चव्हाण, (वय 54  रा. भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोहित बारेक, इस्लाम शेख पुर्णनाव माहिती नाही. मोहसीन शेख, (रा. सद्गुरूनगर भोसरी)  ह्या आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी यांचा मुलगा पाणी भरण्यासाठी सार्वजनिक नळावर गेले असता त्यांची आरोपी सोबत बाचबाची होऊन भांडण झाले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 27 जुलैला सकाळी 9 वा चे सुमारास अंकुशराव लांडगे सभागृह, भोसरी जवळ आरोपी बारेकने जुन्या भांडणाचा राग मनात धरून हातातील प्लास्टरचे बांधकामाचे लाकडी टिपणीने डोक्यात जोरात मारले. तसेच इस्लाम शेखने लाकडी दांडक्याने पाठीत मारून म्हणाला की, तुला जिवंत सोडत नाही. कोणतेही राग येण्यासारखे आकस्मिक कारण नसताना जबर मारहाण केली, त्यात त्याचा जीव जाऊ शकला असता.
हे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी गेले असता त्यांनाही शिवीगाळ, दमदाटी करून हाताने मारहाण करून किरकोळ जखमी केले आहे.
मोहसीन शेखने 25 जुलैला झालेल्या भांडणात फिर्यादीच्या मुलाशी लाकडी दांडक्याने मारहाण केली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.