Crime News : जुन्या भांडणातून एकावर कुऱ्हाडीने वार

एमपीसी न्यूज –  जुन्या भांडणातून एकाने व्यावसायिकावर (Crime News) कुऱ्हाडीने वार करण्यात आले आहेत. हा प्रकार शनिवारी (दि.19) पवळेवाडी, खेड येथे घडला आहे.

विक्रम शिवाजी पवळे (वय 36 रा.पवळेवाडी) यांनी फिर्याद दिली असून महेश कांताराम पवळे (रा. खेड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Alandi News : आळंदी येथील इंद्रायणी नदी पात्रात अनोळखी पुरुषाचा मृतदेह सापडल्याने खळबळ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा दारू पिऊन आला व त्याने फिर्यादीला शिवीगाळ करत पाठीच्या सॅकमधून कुऱ्हाड काढून त्याने फिर्यादीच्या हातावर, डोक्यावर वार करत जखमी केले आहे.(Crime News) तसेच फिर्यादीचे मेहुणे व आई-वडिल यांना शिवीगाळ करत तुला सोडणार नाही अशी धमकी देत फिर्यादी .यांच्या भाच्यालाही जखमी केले. यावरून चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.