Auction Of Coal Mines: कोळसा क्षेत्राला दशकांपासूनच्या लॉकडाऊनमधून बाहेर काढले- पंतप्रधान मोदी

Auction Of Coal Mines: Coal sector pulled out of decades of lockdown says PM Modi वर्ष २०१४ नंतर आम्ही कोळसा क्षेत्रात अनेक सुधारणा केल्या. आता भारताने कोळसा आणि खाण क्षेत्रातील स्पर्धेसाठी, सहभागासाठी उघडण्याचा निर्णय घेतला आहे.

एमपीसी न्यूज- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून वाणिज्यिक खाणकामासाठी 41 कोळसा खाणींच्या लिलाव प्रक्रियेची सुरुवात केली. यावेळी पंतप्रधानांनी भारत कोरोनाशी लढेलही आणि पुढेही जाईल, असे म्हटले. या मोठ्या संकटाचे भारत संधीत बदल करेल असा विश्वास व्यक्त करताना कोरोनाच्या या संकटाने भारताला ‘आत्मनिर्भर भारत’ होण्याचा धडा दिला असल्याचे ते म्हणाले.

ते म्हणाले, आत्मनिर्भर भारत म्हणजे भारत आयातीवरील आपली निर्भरता कमी करेल. आत्मनिर्भर भारत म्हणजेच भारत आयातीवर खर्च होणारे लाखो-कोट्यवधी रुपयांचे विदेशी चलन वाचवेल. आत्मनिर्भर भारत म्हणजे भारताला आयात करावे लागू नये, त्यामुळे आपल्याच देशात साधन आणि संसाधन विकसित करावे लागतील.

महिन्याच्या आतच प्रत्येक घोषणा, प्रत्येक सुधारणा मग ती कृषी क्षेत्रातील असो किंवा एमएसएमई क्षेत्रातील किंवा आता कोळसा आणि खाण क्षेत्रातील असो, आपण वेगाने जमिनीवर उतरत आहोत. यावरुन दिसून येते की भारत या संकटाचे संधीत रुपांतर करण्यासाठी किती गंभीर आहे.

आज आपण फक्त वाणिज्यिक कोळसा खाणीच्या लिलावाला सुरुवात केलेली नाही तर कोळसा क्षेत्राला अनेक दशकांपासूनच्या लॉकडाऊनमधूनही बाहेर काढत आहोत.


वर्ष २०१४ नंतर आम्ही कोळसा क्षेत्रात अनेक सुधारणा केल्या. आता भारताने कोळसा आणि खाण क्षेत्रातील स्पर्धेसाठी, सहभागासाठी उघडण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या स्पर्धकांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, हेही ध्यानात घेतले आहे.

कोळसा आणि खाण आपल्या अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे आधार आहेत. या निर्णयानंतर संपूर्ण कोळसा खाण आत्मनिर्भर होतील. आता या क्षेत्रासाठी बाजार खुला झाला आहे. ज्याला जेवढी गरज आहे, तेवढी तो खरेदी करेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.