Aundh Crime News : कंपनीत पार्टनर करुन घेण्याचे आमिष दाखवत महिलेला दोन लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज – कंपनीत पार्टनर करुन घेण्याचे आमिष दाखवत 46 वर्षीय महिलेला दोन लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. जुलै 2019 ते 5 जून 2021 दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी कंपनी मालकाविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी कोथरुड येथील 46 वर्षीय महिलेने चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कंपनी मालकाविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना कंपनी मालकाने कंपनीत पार्टनर करुन घेण्याचे आमिष दाखवत कंपनीत गुंतवणूक करण्यास सांगितले. महिलेने पैसे गुंतवले पण आरोपी कंपनीत पार्टनर करुन घेतले नाही तसेच, तुमचे केवळ साडे सात लाख रुपये शिल्लक असून बाकीचे प्रवास, जेवणं यावर खर्च झाल्याचे सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.