Ayodhya Ram Temple Bhoomipujan: अयोध्येत दाखविणार 1 लाख 11 हजार लाडूंचा नैवेद्य

Ayodhya Ram temple bhoomipujan 1,11,000 laddoos will be prepared for offerings on Aug 5th हे लाडू भूमीपूजनाच्या दिवशी अयोध्या धाम आणि अनेक तीर्थ क्षेत्रांच्या ठिकाणी वितरित केले जाणार आहेत.

एमपीसी न्यूज- अयोध्या येथे 5 ऑगस्ट रोजी श्रीराम मंदिराच्या भूमीपूजनाची तयारी जोरात सुरु आहे. एकीकडे संपूर्ण अयोध्या सजवली जात आहे. तर दुसरीकडे रामललाचे वस्त्र आणि त्यादिवशीच्या नैवद्याचीही तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. अयोध्या धामच्या मणिराम दास छावणीमध्ये भूमीपूजनासाठी 1 लाख 11 हजार लाडू तयार करण्याचे काम सुरु झाले आहे. हे लाडू स्टीलच्या डब्यात पॅक केले जात आहेत. प्रसादाचे हे लाडू देवराहा बाबा स्थळाशी निगडीत अनुयायी बनवत आहेत.

हे लाडू भूमीपूजनाच्या दिवशी अयोध्या धाम आणि अनेक तीर्थ क्षेत्रांच्या ठिकाणी वितरित केले जाणार आहेत. भूमीपूजनाच्या दिवशी 111 थाळीत सजवलेले लाडू रामललाच्या दरबारात पाठवले जातील.


तत्पूर्वी, आज अयोध्यामध्ये राम मंदिर शिलान्यास आणि भूमीपूजनाशी निगडित तयारीचा आढावा घेण्यासाठी गृह विभागाचे प्रमुख सचिव अवनीश अवस्थी आणि राज्याचे पोलीस प्रमुख अयोध्येत पोहोचले.

कोरोनामुळे हा कार्यक्रम मर्यादित लोकांच्या उपस्थितीत होणार आहे. राम मंदिर ट्रस्टने लोकांना अयोध्येत येण्याचा प्रयत्न करु नका, असे आवाहन केले आहे. त्यांनी दूरदर्शनवरुन त्याचे थेट प्रसारण पाहण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर घरी दिवा लावून स्वागत करण्यासही सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.