Vadgaon Maval News : राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेल मावळ तालुकाध्यक्षपदी बाबा मुलाणी यांची निवड

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील बाबा उर्फ अमीर गफूरभाई मुलाणी यांची राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलच्या मावळ तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे पत्र तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी दिले.

मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी मावळ तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, माजी सभापती विठ्ठलराव शिंदे, राष्ट्रवादी तालुका कार्याध्यक्ष साहेबराव कारके, माजी नगरसेवक आयुबभाई सिकिलकर यांचे उपस्थितीत निवडीचे पत्र देण्यात आले.

यावेळी जमीर नालबंद, औरंग सादुले, नदीम शेख, आफताब सय्यद, एजाज सिकिलकर,मन्सूर शाह,तसेच याप्रसंगी तळेगाव दाभाडे, वडगाव, देहूरोड व लोणावळा आदी परिसरातील कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.