Talegaon Dabhade News : महाआरोग्य शिबिरात शेकडो नागरिकांची तपासणी; 50 पिशव्यांचे रक्त संकलन

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील सेवाधाम ट्रस्ट संचलित सेवाधाम हाॅस्पिटलच्या वतीने रविवारी (दि. 27) महा आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर घेण्यात आले. या महा आरोग्य शिबिरात शेकडो नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच 50 पिशव्यांचे रक्त संकलन देखील करण्यात आले. सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत हे शिबीर पार पडले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून सीआरपीएफचे डायरेक्टर सर्व्हिसेस डाॅ राधा व डीआयजी धीरज सिन्हा तर सीआरपीएफचे मेडिकल सुप्रीटेंडेंट अमनकुमार व डाॅ निलम बुंदेला यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेचे संस्थापक विश्वस्त डॉ कृष्णकांत वाढोकर, कार्यकारी विश्वस्त डॉ सत्यजित वाढोकर, माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

मेडिसिन, ह्रदयरोग, स्त्रीरोग, बालरोग, अस्थिरोग, शस्त्रक्रिया लहान मुलांच्या एक्सरे, सीटी स्कॅन, रक्त लघवी, तपासणीत 30 टक्के सवलत देण्यात आली. यावेळी सूत्रसंचालन दिपाली गुरव यांनी केले तर दीपक भार्गव यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.