Bhosari Crime News : के.टी.एम वरून आलेल्या चोरट्यांनी महिलेचे गंठण हिसकावले

एमपीसी न्यूज – के.टी.एम वरून आलेल्या चोरट्यांनी दुचाकी वरून निघालेल्या महिलेच्या गळ्यातील गंठण हिसकावले. 13 ग्रॅम वजनाचे हे गंठण 45 हजार रूपयांचे होते. अर्थव हॉटेलच्या पुढे, बोराटे वस्ती, मोशी येथे 28 मार्च 2022 रोजी ही घटना घडली.

महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. त्यावरून के.टी.एम वरून आलेल्या दोन चोरट्याविरोधात भारतीय दंड विधान कलम 392, 34 प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांच्या आते भावासोबत दुचाकीवरून दवाखान्यात जात होत्या. त्यावेळी के.टी.एम वरून आलेल्या दोन चोरट्यांनी फिर्यादी यांच्या गळ्यातील 45 हजार रूपये किंमतीचे गंठण हिसकावले. असे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.