Pimpri News : गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीविरोधात नागरिकांनी रस्त्यावर उतरावे; काँग्रेसचे आवाहन

एमपीसी न्यूज – दररोज वाढणा-या पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरवाढीमुळे महागाई वाढत आहे. या रोज वाढणा-या महागाईमुळे सर्वसामान्य जनता हवालदिल झाली आहे. या विरुध्द सर्व नागरिकांनी रस्त्यावर उतरुन केंद्र सरकारचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध करावा असे आवाहन काँग्रेसने केले.

फेब्रुवारी महिन्यात झालेल्या पाच राज्यातील निवडणूकींच्या निकालानंतर मागील आठ दिवसात पाच रुपये साठ पैशांपेक्षा जास्त इंधन दरवाढ करण्यात आली. त्यामुळे भाजीपाला, किराणा माल, कडधान्ये, गॅस अशा जीवनावश्यक सर्वच वस्तूंची भाववाढ होत आहे. महागाईचा हा भस्मासुर सर्व सामान्य जनतेला गिळून टाकेल ही भाववाढ थांबली पाहिजे. या मागणीसाठी आणि केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी (दि. 1 एप्रिल) पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

शहराध्यक्ष कैलास कदम, ज्येष्ठ नेते अशोक मोरे, वरिष्ठ शहर उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, महिला शहराध्यक्षा सायली नढे, युवक शहराध्यक्ष कौस्तुभ नवले, एनएसयुआय प्रदेश उपाध्यक्ष उमेश खंदारे, सेवादलाचे शहराध्यक्ष विरेंद्र गायकवाड, माजी नगरसेवक विश्वास गजलमल तसेच दिलीप पांढरकर, सौरभ शिंदे, रवि नांगरे, विजय ओव्हाळ, बाबा बनसोडे, गौतम ओव्हाळ, सचिन कोंढरे, सुनील राऊत, दिनकर भालेकर, आबा खराडे, हिराचंद जाधव, विश्वनाथ जगताप, आकाश शिंदे, डॉ. मनिषा गरुड, आण्णा कसबे, माऊली मलशेट्टी, विशाल सरवदे, गणेश नांगरे, सतिश भोसले, आशा भोसले, अजय काटे, सचिन सोनटक्के, वसंत वावरे, मिलिंद बनसोडे, किरण खोजेकर, मिलिंद फडतरे, उमेश बनसोडे, जेव्हीयर ॲन्थोनी, स्वाती शिंदे, सुप्रिया कदम, सोनु दमवानी, रावसाहेब सरोदे, रमेश वाघमारे, रोशनी बेहराणी, संदिप शिंदे, भारती, घाग, रिया फर्नांडीस, हरीश डोळस, मोहसिन शाह, सुप्रिया पोहरे, दिपाली भालेकर, निर्मला खैरे, सुवर्णा कदम, शितल सिकंदर, सुनिता जाधव, स्वाती सपकाळ, सचिन सातपुते, अनिकेत नवले, रवी शेळके, किरण नढे, विष्णु शिंदे आदी उपस्थित होते.

या आंदोलनात काँग्रेस कार्यकर्त्यांनी दुचाकी वाहनांना, गॅस सिलेंडरला हार घालून महागाईचा निषेध केला. तसेच टाळ आणि मृदंग वाजवून केंद्र सरकारच्या विरोधी घोषणा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.