Baramati news: बारामतीत दारूने भरलेला ट्रकला अपघात , नागरिकांनी पळवले दारूचे बॉक्स

एमपीसी न्यूज : बारामती शहरापासून जवळच असणाऱ्या उंडवडी कडे पठार येथे आज पहाटेच्या सुमारास दारूने भरलेला ट्रकला अपघात झाला. बारामती पाटस महामार्गावर ही घटना घडली. त्यानंतर अपघातग्रस्त जागेच्या अवतीभोवती राहणाऱ्या गावातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी करत दारूचे बॉक्स पळवल्याचे उघडकीस आले. या ट्रकमध्ये 65 लाख रुपये किमतीचे 950 दारूचे भरले होते. अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, बारामती पाटस रस्त्यावरील पवार ढाब्यासमोर हा ट्रक पलटी झाला. चालकाचा डोळे लागल्याने हा अपघात झाला. दरम्यान दारूचा ट्रक पलटी झाल्याची वार्ता काही क्षणातच आजूबाजूच्या गावात पसरली. त्यानंतर त्या ठिकाणी झुंडीने आलेल्या नागरिकांनी पोत्यात, पिशव्यात जमेल तसे दारुच्या बाटल्या पळवून नेल्या. यामध्ये महिलांचे प्रमाणही लक्षणीय होते.

एकीकडे ट्रकचालक आणि क्लिनर अपघातग्रस्त ट्रक मध्येच अडकून पडले असताना त्यांना बाहेर काढण्याऐवजी नागरिकांनी दारू पळवून नेण्यावर भर दिला. त्यांना बाहेर काढण्यासाठी कोणीही मदत केली नाही. जीवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा मात्र नागरिकांनी दारूच्या बाटल्या सोडून पळ काढला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.