Bavdhan : बायकोला त्रास देतो म्हणून लोखंडी रॉडने मारहाण

एमपीसी न्यूज –  माझ्या बायकोला त्रास का दोतो म्हणत दोघांनी एकाला लोखंडी रॉडने मारहाण केली आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.11) बावधन (Bavdhan) येथे भर रस्त्यात रात्री सव्वा आठ वाजता घडला.

सुनिल धर्मा पवार (वय 30, रा.बावधन) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आदिनाथ शिवाजी बळवंते (वय 35, रा. बावधन) याला अटक केली असून अमोल शिवाजी बळवंते (वय 30, रा.बावधन) अद्याप फरार आहे.

Katavi : कातवी गावाला प्रथमच मिळाले नगरसेवक पद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे दुचाकीवरून आले व त्यातील आदिनाथ याने फिर्यादी यांना तू माझ्या बायकोला का त्रास देतोस? म्हणत (Bavdhan) शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच फिर्यादी यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारून गंभीर जखमी केले. फिर्यादी यांची बहिणही त्यांच्या सोबत होती, तिलाही आरोपींनी लाकडी दांडक्याने मारून जखमी केले. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.