रविवार, सप्टेंबर 25, 2022

Katavi : कातवी गावाला प्रथमच मिळाले नगरसेवक पद

भाजपाचे श्रीधर चव्हाण यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड

एमपीसी न्यूज – वडगाव ग्रामपंचायतमध्ये समाविष्ट असलेले कातवी गाव (Katavi) नगरपंचायत झाल्यानंतरही वडगावमध्येच राहिले. त्यानंतर पहिली नगरपंचायतची निवडणूक झाली. मात्र त्यात कातवी गावाला एकही नगरसेवक पद मिळाले नव्हते. मात्र, आता भाजपाचे श्रीधर धर्मनाथ चव्हाण यांची वडगाव नगरपंचायतच्या स्वीकृत नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाल्याने कातवी गावाला प्रथमच नगरसेवक पद मिळाले आहे.
वडगाव नगरपंचायतमध्ये समावेश असूनही अनेकदा दुर्लक्षित राहिलेला भाग म्हणूनच या गावाची ओळख होती. मात्र आता नगरसेवक पद मिळाल्याने श्रीधर चव्हाण यांच्या माध्यमातून गावातील रखडलेली कामे मार्गी लागतील असा कातवी ग्रामस्थांना विश्वास आहे.
स्वीकृत नगरसेवक भूषण मुथा यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी चव्हाण यांनी अर्ज दाखल केला होता. या पदासाठी त्यांचा एकमेव अर्ज आल्याने नगरपंचायतच्या विशेष सभेत नगराध्यक्षांनी श्रीधर चव्हाण यांची निवड जाहीर केली.
भाजपचे स्वीकृत नगरसेवक भूषण मुथा यांनी पक्षांतर्गत ठरलेल्या धोरणाप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने ही निवडणूक घेण्यात आली जिल्हा प्रशासनाकडे श्रीधर चव्हाण यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता पिठासिन अधिकारी तथा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मयुर ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत ढोरे यांनी श्रीधर चव्हाण यांची बिनविरोध निवड जाहीर केली. यावेळी विरोधी पक्षनेत्या अर्चना म्हाळसकर, भाजपाचे गटनेते दिनेश ढोरे, नगरसेवक किरण म्हाळसकर, दिलीप म्हाळसकर, प्रविण चव्हाण आदी उपस्थित होते.
यावेळी माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे, मावळ भाजपाचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, वडगाव शहर भाजपाचे अध्यक्ष अनंता कुडे, माजी उपसरपंच सुधाकर ढोरे, सोमनाथ काळे, माजी नगरसेवक विजय जाधव, शामराव ढोरे, युवामोर्चा अध्यक्ष विनायक भेगडे, किरण भिलारे, महिंद्र म्हाळसकर,संपत म्हाळसकर, मकरंद बवरे, शंकर भोडवे, दिपक भालेराव, नाथा घुले, संतोष पिंपळेसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवर आणि ग्रामस्थांकडून नगरसेवक चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला व कातवी गावातून (Karavi)
ग्रामस्थांकडून विजयी मिरवणूक काढण्यात आली.
https://youtu.be/jovI-MJU5YE
spot_img
Latest news
Related news