Talegaon dabhade : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या दिवशी होणारे लाक्षणिक उपोषण स्थगित

एमपीसी न्यूज – देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यावर्षी 15 ऑगस्ट रोजी साजरा होत आहे. मात्र तळेगाव दाभाडे शहरात अनेक भागात विकासकामांना खीळ बसली आहे. भ्रष्टाचार वाढला आहे. लिखित तक्रारी करूनही प्रशासन दखल घेत नाही, याच्या विरोधात भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास यांच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले (Talegaon dabhade)
जाणार होते. 
याप्रकरणी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी संघटनेच्या पदाधिका-यांना बुधवारी (दि.17) चर्चेसाठी बोलावले असल्याने हे उपोषण स्थगित करण्यात आले आहे.

मुख्याधिका-यांच्या चर्चेत योग्य मार्ग निघाला नाही तर पुन्हा पुढील आंदोलनाची दिशा ठरणार असल्याचे पुणे जिल्हा (Talegaon Dabhade) संघटक अरुण माने यांनी सांगितले.
https://youtu.be/jovI-MJU5YE

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.