Hinjawadi News : पूर्ववैमनस्यातून हॉटेल चालकाला मारहाण

एमपीसी न्यूज – पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून तीन जणांनी मिळून एका हॉटेल चालकाला मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 28) रात्री बावधन येथील हॉटेल पूजा गार्डन येथे घडली.

विजय विठ्ठल कराळे (वय 29, रा. बावधन, पुणे) यांनी बुधवारी (दि. 29) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिल म्हेत्रे, सुनील म्हेत्रे आणि आदित्य म्हेत्रे (सर्व रा. चांदणी चौक, बावधन) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी कराळे हे त्यांच्या हॉटेल पूजा गार्डनमध्ये जेवण करून बसले होते. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपींनी पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादी यांना शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच आरोपी अनिल म्हेत्रे याने त्याच्याकडील लोखंडी वस्तूने फिर्यादी यांच्या पायावर मारून त्यांना जखमी केले. तसेच बघून घेण्याची धमकी दिली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.