Maval : दिगंबर भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त गणेश उत्सवादरम्यान बेंच वाटप

एमपीसी न्यूज – मावळचे माजी आमदार दिगंबर भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा व मावळ प्रबोधिनी संस्थेच्या वतीने संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये गणेश उत्सवादरम्यान गणेश मंडळाच्या माध्यमातून गावोगावी व वाड्यावस्त्यावर, मंदिराजवळ, चावडीजवळ, मुख्य चौक, एस.टी. स्टँड, बस स्टॉप अशा ठिकाणी ज्येष्ठ नागरिक, महिला व शालेय विद्यार्थी यांना बसण्यासाठी बेंच वाटप करण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ आज रविवारी (दि 09) सकाळी दहा वाजता कुंडमळा, इंदोरी, मावळ येथे करण्यात आला.

यावेळी पुणे जिल्हा भाजपाचे ज्येष्ठ नेते केशवराव वाडेकर, पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष, मावळचे आमदार संजय भेगडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुणे जिल्हा माजी संघचालक सुरेश शहा, पुणे जिल्हा भारतीय किसान संघाचे अध्यक्ष शंकरराव शेलार, मावळ पंचायत समितीचे सभापती गुलाबराव म्हाळस्कर, मावळ तालुका भाजप अध्यक्ष प्रशांत (अण्णा) ढोरे, मावळ तालुका भाजप प्रभारी भास्करराव म्हाळस्कर, मावळ पंचायत समितीचे माजी सभापती एकनाथराव टिळे, यांनी आमदार दिगंबरशेठ भेगडे यांना शुभेच्छा दिल्या. मावळ पंचायत समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक पांडुरंग ठाकर (सर), माजी संचालक भाऊसाहेब पाणमंद, माजी संचालक तानाजी भोंडवे, महाराष्ट्र प्रदेश आरपीआय सरचिटणीस चांद्रकांताताई सोनकांबळे, प्रोफेसर मनोज वाखारे, माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर भोसले, बंडोपंत भेगडे, पोपटराव भेगडे पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष संदीप सोमवंशी हभप कीर्तनकार भगवान महाराज शेवकर, घोरवडेश्वर देवस्थान ट्रस्टचे दत्ता मामा तरस, मधुकर बोडके, देहूरोड कॅन्टोमेंट बोर्ड माजी उपाध्यक्ष पोपटराव भेगडे, यासह पुणे जिल्ह्यातील भाजपचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी मावळ तालुक्याच्या विकासात व मावळ तालुका भाजपची संघटना पाया भक्कम करण्यात दिगंबर भेगडे यांचा महत्वाचा वाटा असल्याचे मत अध्यक्ष प्रशांत ढोरे यांनी व्यक्त केले.

तसेच राजकारणात राहून वारकरी संप्रदाय व भाजपचे नाव याला डाग लागू दिला नाही. भाजपचे दिवगंत नेते गोपीनाथ मुंढे हे दिगंबर भेगडे यांच्याबाबत कोळशाच्या खाणीत राहून देखील हिऱ्याप्रमाणे राहिल्याचे उल्लेख आवर्जुन करत, असे एकनाथराव टिळे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.