Pune News : एआयसीटीई -सीआयआय’ सर्वेक्षणात भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयास मानांकन 

एमपीसी न्यूज : ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई ) आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री यांच्या सर्वेक्षणात  भारती अभिमत विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयास प्लॅटिनम दर्जाचे महाविद्यालय असे मानांकन मिळाले आहे. भारती अभिमत विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आनंद भालेराव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. 

उद्योगांना पूरक अभियांत्रिकी प्रशिक्षण आणि उपक्रम,बाजारपेठेच्या गरजेनुसार प्रतिभा निर्मिती,अभ्यासक्रमाची रचना करताना उद्योग जगताचा सहभाग,इंडस्ट्री उद्योगांना  अभ्यास भेटी,उद्योगांकडून प्रत्यक्ष प्रशिक्षण,राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय स्तरावरील संयुक्त प्रकल्प,उद्योगभिमुख प्रकल्प आणि कौशल्ये प्रशिक्षण,विद्यार्थ्यांना मिळालेल्या प्लेसमेंट,रोजगार संधी,स्टार्ट अप्स अशा अनेक निकषांवर आधारित असे हे सर्वेक्षण होते.

या सर्व निकषांचा  विचार करता प्लॅटिनम दर्जा मिळविण्यात यशस्वी ठरली.  एकूण ८१४ इन्स्टिट्यूट्स या अखिल भारतीय स्तरावरील सर्वेक्षणात सहभागी झाल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.