Bhosari : कासारवाडी येथे 16 हजारांची घरफोडी

16 thousand burglary at Kasarwadi घर कुलूप लाऊन बंद होते, दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला.

एमपीसी न्यूज – कासारवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून 16 हजार 640 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 29) सकाळी उघडकीस आली आहे.

नदीम गुलाम रसूल शेख (वय 40, रा. कासारवाडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर रविवारी (दि. 28) सकाळी दहा ते सोमवारी (दि. 29) सकाळी दहा या कालावधीत कुलूप लाऊन बंद होते. दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला.

त्यांनतर घरातून सोन्याचे कर्णफुले, सोन्याची साखळी, चांदीचे पैंजण, सोन्याची नाकाची चमकी, सोन्याची तार, सोन्याची अंगठी आणि रोख रक्कम असा एकूण 16 हजार 640 रुपयांचा ऐवज चोरून नेला.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.