Wakad : गुन्ह्याच्या तयारीत असलेल्या तरुणाला अटक

Arrest of a young man who was preparing for a crime

एमपीसी न्यूज – अंधारात आपले अस्तित्व लपवून संशयितरीत्या बसून गुन्ह्याच्या तयारीत असलेल्या तरुणाला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 1) पहाटे जगतापनगर, थेरगाव येथे करण्यात आली आहे.

संजय भीमा रनसुरे (वय 20, रा. थेरगाव) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई प्रशांत गिलबिले यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे दोनच्या सुमारास आरोपी संजय आपले अस्तित्व लपवून घरांना कड्या लाऊन जगतापनगर, थेरगाव येथे अंधारात बसला होता. तो कोणतातरी गुन्हा करण्याच्या तयारीत होता. त्यावेळी गस्तीवरील पोलिसांना याबाबत माहिती मिळाली.

पोलिसांनी संजय याला अटक करून त्याच्यावर भारतीय दंड विधान कलम 160, महराष्ट्र पोलीस अधिनियामान्वाये गुन्हा नोंदवला आहे.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.