Bhosari : पोलीस ठाण्यासमोर केस धरून मारहाण करणाऱ्या दोन महिलांसह तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन महिलांनी पोलीस ठाण्यासमोरच एकमेकींचे केस धरून मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 27) दुपारी दोन वाजता एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यासमोर घडली.

तबासून सुलेमान इनामदार (वय 50), प्रज्ञा गणेश बहिरट (वय 40, दोघी रा गंधर्वनगरी, मोशी) यांच्यासह एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महिला पोलीस नाईक दिपमाला लोहकरे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला यांच्यात जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद आहेत. याबाबत आरोपी सोमवारी सुपारी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात आले होते.

तिन्ही आरोपींनी एकमेकांचे केस धरून मारहाण केली. त्यानंतर पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.