BNR-HDR-TOP-Mobile

Bhosari : दहा हजारांची लाच स्वीकारताना पोलीस कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज- दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये कारवाई न करण्यासाठी तक्रारदाराकडून 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस कर्मचाऱ्याला सापळा रचून रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी (दि. 5) केली.

भरत सोनू बांगर (वय 38, पोलीस नाईक 723, भोसरी एम आय डी सी पोलीस स्टेशन) असे लाच स्वीकारणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी एका 55 वर्षाच्या तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांना एम आय डी सी भोसरी येथील एका कंपनीचे जुनेपत्रे काढून नवीन पत्रे बसविण्याचे काम मिळाले होते. ते काम तक्रारदार यांनी त्यांचे परिचयाच्या इसमाला मजुरीवर दिले होते. सदरचे काम चालू असताना तो इसम पडून जखमी झालेला होता. याबाबतची फिर्याद भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्यावरून आरोपी भरत बांगर यांनी दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये कारवाई न करण्यासाठी तक्रारदाराकडे 25 हजार रुपयांची लाच मागितली होती.

तडजोडीअंती 20 हजार रुपये लाच देण्याचे ठरले. लाचेच्या रकमेपैकी 10 हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले.

Advertisement

HB_POST_END_FTR-A3