Bhosari : गाडीची हवा सोडली म्हणून घरात घुसून तरुणाचे दात पाडले

एमपीसी न्यूज – मोटारसायकलची हवा सोडल्याच्या कारणावरून तिघांनी मिळून तरुणाच्या घरात घुसून त्याला मारहाण केली. त्यात तरुणाचे दात पडले. तसेच दोघा भावंडांना बघून घेण्याची धमकी दिली. हा प्रकार वरची आळी दापोडी येथे रविवारी (दि. 17) दुपारी दीडच्या सुमारास घडला.

किरण मच्छिंद्र बोराडे (वय 29, रा. वरची आळी, दापोडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार युवराज काळे (रा. वरची आळी, दापोडी), पप्पू देवकाते, मनोज बारटक्के (दोघे रा. बॉम्बे कॉलनी, दापोडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रविवारी दुपारी फिर्यादी किरण यांच्या घरात घुसले. ‘माझ्या अपाची गाडीची हवा का सोडली’ असे म्हणून आरोपींनी किरण यांना शिवीगाळ करून तोंडावर व कपाळावर मारहाण केली. यामध्ये किरण यांचा एक दात पडला. तसेच किरण यांचा भाऊ कमलेश याला देखील हाताने मारहाण करून जखमी केले. दोघा भावांना बघून घेण्याची धमकी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.