Bhosari : बनावट कागदपत्रे बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

पिंपरी-चिंचवड दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई

एमपीसी न्यूज – बनावट कागदपत्रे बनवणाऱ्या टोळीचा पिंपरी-चिंचवड दहशतवाद विरोधी शाखेने (Bhosari) पर्दाफाश केला. एका महिलेसह चार जणांना पुणे-नाशिक महामार्गावर, भोसरी येथून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 6) करण्यात आली.

शिवराज प्रकाश चांभारे कांबळे (वय 40), महिला (वय 36), धोंडीबा प्रकाश शेवाळकर (वय 24, तिघे रा. धावडेवस्ती, भोसरी), गणेश रामदास यंगड (वय 23, आ. आल्हाटवाडी, मोशी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिवराज आणि महिलेचे झेरॉक्स व स्टेशनरी साहित्य विक्रीचे दुकान आहे. तिथे त्यांचे अधिकृत आधारकार्ड सेवा केंद्र असल्याचे त्यांनी नागरिकांना भासवले.

Pimpri : पिंपरी-चिंचवडमधील विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला ‘व्यासपीठ’

त्यांच्या दुकानातून आरोपींनी नागरिकांची बनावट कागदपत्रे बनवून दिली. विविध शासकीय कागदपत्रांमध्ये अनधिकृतपणे बदल केले. याबाबत पिंपरी-चिंचवड दहशतवाद विरोधी शाखेला माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शिवराज, एक महिला आणि त्यांच्या दुकानात काम करणारे अन्य दोन आरोपी यांना ताब्यात घेतले.

आरोपी मागील दोन ते तीन वर्षांपासून त्यांच्या दुकानातून बनावट (Bhosari) कागदपत्रे बनवण्याचे काम करत होते. याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम 420, 465, 468, 471, 473, 34, आधार कायदा 2016चे कलम 36 आणि 42 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.