Bhosari : भोसरीत तरुणाला शस्त्राचा धाक दाखवून केले अनैसर्गिक कृत्य

एमपीसी न्यूज – ऑनलाइन ॲपवरुन झालेली (Bhosari) ओळख महाविद्यालयीन तरुणाला महागात पडली. तरुणाला आमिष दाखवून त्याचे ससून रुग्णालय परिसरातून अपहरण करण्यात आले. भोसरी परिसरात तरुणाला विळ्याचा धाक दाखवून त्याच्याशी तिघांनी अनैसर्गिक कृत्य केले. त्यानंतर आरोपींनी तरुणाला धमकावून त्याच्याकडील 28 हजार 500 रुपयांची रोकड लुटल्याची घटना घडली.

याबाबत एका 21 वर्षीय (रा. तळेगाव दाभाडे) तरुणाने(Bhosari)  बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण तळेगाव दाभाडे येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. एका ॲपवरुन तरुणाची आरोपींशी ओळख झाली होती. आरोपींनी त्याला मैत्रीच्या जाळ्यात ओढले.

त्याला पुणे स्टेशन परिसरात भेटण्यास बोलावले. ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ तरुणाला मोटारीत बसण्यास सांगितले. फिरायला जाऊ असे सांगून आरोपींनी त्याला मोटारीतून भोसरी एमआयडीसी परिसरात नेले.

Maharashtra : सोयाबीनवरील रोगाच्या प्रादुर्भावाचे होणार पंचनामे

भोसरी एमआयडीसी परिसरात निर्जन जागी आरोपींनी त्याच्याशी अनैसर्गिक कृत्य केले. तरुणाला धमकावून ऑनलाइन पद्धतीने त्याच्या खात्यातील 28 हजार 500 रुपये काढून घेतले.तसेच कोणाला सांगितले तर तुझी ओळख उघडकरू अशी धमकी देत तरुणाला सोडून तिघेजण मोटारीतून पसार जाले. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.