Bhosari News: वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या रस्त्यावरील 18 पत्राशेड, 12 अनधिकृत टप-यांवर कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण पथकाने आज वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या रस्त्यावरील 18 पत्राशेड व 12 अनधिकृत टपऱ्या हटविण्याची कारवाई केली.

पिंपरी-चिंचवड शहरात अतिक्रमण कारवाई जोरदार सुरू आहे. शहराच्या विविध भागात दररोज कारवाई केली जात आहे. सकाळी अतिक्रमण कारवाईला सुरुवात करण्यात आली. ‘क’ प्रभाग अंतर्गत खंडेवस्ती चौक, इंद्रायणी नगर, मोई चौक, जाधववाडी – कुळवाडी, जय गणेश साम्राज्य चौक , इंद्रायणी नगर येथील 12 टपऱ्या, 18 अनधिकृत पत्राशेड , 6 हातगाड्यावर अतिक्रमणची कारवाई करण्यात आली.

सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे , प्रशासन अधिकारी नाना मोरे यांच्या नियंत्रणाखाली व बीट निरीक्षक संतोष शिरसाठ, प्रसाद आल्हाट, निवृत्ती गुणवरे, शितल भोसले, दिपाली जगदाळे , अतिक्रमण निरीक्षक ज्ञानेश्वर केळकर , सुपरवायझर पंकज वाघे, क प्रभाग अतिक्रमण पथक, महाराष्ट्र सुरक्षा बल व महाराष्ट्र पोलीस यांच्या पथकाने ही कारवाई केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.