Pimpri News : विनामास्क वावरणाऱ्या 181 नागरिकांवर दंडात्मक कारवाई

एमपीसी न्यूज – विनामास्क वावरणाऱ्या 181 नागरिकांवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घराबाहेर पडल्यावर मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे.

कोरोना नियमांचे उल्लंघन करून विनामास्क वावरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत. याची सध्या काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. शुक्रवारी 181 नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. वाकडमध्ये 51, निगडी चिंचवड प्रत्येकी 15, आळंदी 24, चाकण 27, दिघी 13, सांगवी 11, रावेत 6, भोसरी एम आय डी सी 12, म्हाळुंगे 7 जणांवर कारवाई करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.