Bhosari : अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना भोसरी येथे गुरुवारी (दि. 9) सायंकाळी घडली.

याप्रकरणी तेरा वर्षीय पीडित अल्पवयीन मुलीने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विशाल राजभर (वय 24, रा. भोसरी) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी राजभर याने पीडीत मुलीच्या अंगाशी लगट करण्याचा प्रयत्न केला. तसेच मनास लज्जा उत्पन्न होईल, असे तिच्याशी वर्तन करून विनयभंग केला.

तसेच तिच्या आई आणि भावासह तिला शिवीगाळ केली. त्यानंतर हाताने मारहाण केली. फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला असून भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.