Bhosari : संत निरंकारी मिशनच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

एमपीसी न्यूज – निरंकारी सदगुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन पुणे झोनच्या वतीने भोसरीतील  संत निरंकारी सत्संग भवन येथे गुरुवार (दि 20 डिसेंबर) सकाळी 8 ते 5 यावेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

भारतात प्रत्येक दिवशी 38000 रक्तदात्यांची गरज असते या सामाजिक कार्याची जाणीव ठेवून अनेक संस्था निःस्वार्थ भावनेने आपले योगदान देत असतात हीच गरज लक्षात घेऊन संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनद्वारा अशा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनचा संकल्प आहे की, होणाऱ्या रक्तदान शिबिरात फाऊंडेशन 1000 हुन अधिक युनिट रक्त संकलित करेल अशी माहिती संत निरंकारी मंडळ भोसरी सेक्टर प्रमुख अंगद जाधव यांनी दिली.या महाशिबिरात भोसरीतील हजारो नागरिकानी रक्तदान करून या मानवतेच्या कार्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.