Pune News : बिग बास्केट या ऑनलाईन मागणीवरून किराणा माल घरपोच देणाऱ्या कंपनीच्या गोडावूनला आग

एमपीसी न्यूज : बावधन येथील उत्तमनगर येथील पुराणिक सोसायटी जवळ बिग बास्केट या ऑनलाईन मागणीवरून किराणा माल घरपोच सेवा देणाऱ्या कंपनीच्या गोडावूनला रात्री ११ वाजण्याच्या सुमारास आग लागली आहे. आग मोठ्या प्रमाणात होती. या आगीत धान्य, भाजीपाला , किराणा सामना जळून खाक झाले आहे. 

सुमारे अग्निशमन दलाच्या ८-१० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवले. दुकान बंद झाल्यामुळे आतमध्ये कुणीही नसेल. मात्र बाहेर सुरक्षारक्षक असतात, अशी प्राथमिक माहिती आहे.आगीबाबत कोथरूड अग्निशमन दलाचे केंद्र प्रमुख गजानन पाथरुडकर यांनी सांगितले की, पत्र्याचे शेड दुकानासारखे परिसर मोठा आहे. आतील १५- २० रिक्षा बाहेर काढल्या आहेत.

आत अनेक गाड्या जळाल्या आहेत. कोथरूड, कात्रज, सिंहगड, पाषाण हिंजवडी येथील अग्निशमन दलाची यंत्रणा घटनास्थळी पोचली असून आग विझविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. आगीत किराणा माल जळून खाक झाला आहे.

 स्थानिक नागरिक शुभम भुंडे यांनी सांगितले की, स्टोअर बंद झाल्याने आत कोणी नसावे. हा सुमारे एक- दीड एकरचा परिसर आहे. सुरवातीला एका कोपऱ्यात आग लागली होती. त्यानंतर जास्त भडकली. परिसरात मोठा जाळ दिसत होता. पार्सल घरी पोचविण्याचे वाहने आत मध्ये असतात.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.