Bihar Political Crisis : बिहारमध्ये भाजप आणि जेडीयूची युती तुटली!

एमपीसी न्यूज : आता महाराष्ट्रानंतर बिहारच्या (Bihar Political Crisis) राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. भाजप आणि जेडीयूची युती तुटली आहे. अधिकृत घोषणा होणे बाकी असली तरी मुख्यमंत्री नितीश कुमार आज दुपारी 4 वाजता राज्यपाल फागू चौहान यांची भेट घेणार आहेत. त्याचवेळी आज झालेल्या जेडीयूच्या बैठकीत पक्षाच्या सर्व आमदार आणि खासदारांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निर्णयाला पाठिंबा देत आम्ही त्यांच्यासोबत असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, ते जे काही निर्णय घेतील, आम्ही सदैव त्यांच्यासोबत राहणार आहे.

Maharashtra Cabinet Expansion : मुंबईच्या ट्राफिकने मंत्र्यांची शपथविधीला उशिरा हजेरी

लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी ट्विट करून लिहिले की, राज्याभिषेकाची तयारी करा, लालटेनधारक येत आहेत. भारतीय जनता पक्षाचे 16 मंत्री राजीनामा देणार नसल्याचंही वृत्त सूत्रांच्या नुसार सांगितले जात आहे. ते मुख्यमंत्री नितीश यांच्या निर्णयाची वाट पाहत आहेत. त्याचवेळी (Bihar Political Crisis) भाजप-जेडीयूमधील वादावर बिहार सरकारमधील मंत्री आणि भाजप नेते शाहनवाज हुसैन म्हणाले की, मला याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. मी पाटण्याला जात आहे… रात्रंदिवस मेहनत करून आम्ही उद्योगाला पुन्हा रुळावर आणले आहे. मला पूर्ण आशा आहे, की इंडस्ट्री रुळावर राहील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.