Maharashtra Cabinet Expansion : मुंबईच्या ट्राफिकने मंत्र्यांची शपथविधीला उशिरा हजेरी

एमपीसी न्यूज : आज सकाळी राज्यभवनात (Maharashtra Cabinet Expansion) शिंदे-फडणवीस सरकारचा शपथ विधी पार पडला. भाजपचे 9 आणि शिंदे गट शिवसेनेचे 9 अशा आमदारांनी मंत्री मंडळाची शपथ घेतली. पण, तानाजी सावंत यांची अधिक चर्चा होताना दिसत आहे. कारण तानाजी सावंत हे मुंबईच्या ट्राफिकमुळे शपथविधीला उशिरा पोहचले.
मुंबईच्या वाढत्या गर्दीने आणि ट्राफिकने रोज सामान्यांना फटका बसतो. पण, आज खुद्द मंत्री महोदयांना या ट्राफिकचा अनुभव आला. मुंबईच्या ट्राफिकमुळे तानाजी सावंत शपथविधी सुरु झाल्यानंतर 10 मिनिटांनी पोहचले. त्यामुळे ते शपथ घेण्यासाठी उशिरा आले. कुलाबा मतदारसंघाचे आमदार राहुल नार्वेकर आणि शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील हे देखील उशिरा पोहचले.