Pune Crime News : बाईक चोराला अटक, 4 लाख 10 हजार किंमतीच्या 17 दुचाकी जप्त 

एमपीसी न्यूज – पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण भागातून दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. पुणे पोलीस, गुन्हे शाखेच्या युनिट चारने नवी पेठ येथून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 4 लाख 10 हजार किंमतीच्या 17 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. 

समीर दत्तात्रय रांगावकर (वय 34, रा. विमाननगर, पुणे मुळगाव – संगमेश्वर, रत्नागिरी) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर दुचाकी चोरीचे विविध पोलीस ठाण्यात 16 गुन्हे उघडकीस आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी पेठेतून चोरी झालेल्या दुचाकी बाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. याचा तपास करत असताना घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. यामध्ये गाडी घेऊन जाणारा इसम हा समीर असल्याची पोलिसांना खात्री पटली. दरम्यान, हा आरोपी नवी पेठ येथे दुचाकी विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी या भागात सापळा रचून समीरला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने उडावा उडवीची उत्तरे दिली. पोलीस खाक्या दाखवता आरोपीने शहराच्या विविध भागातून सतरा दुचाकी चोरी केल्याचे सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.