Black fungus : महाराष्ट्रात म्युकरमायकोसीसचे 2,900 सक्रिय रुग्ण, 1,112 मृत्यू

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात कोरोना सोबत म्युकरमायकोसीसचे (काळी बुरशी) संकट कायम आहे. राज्यात आतापर्यंत 9 हजार 268 म्युकरमायकोसीसचे रुग्ण आढळले असून, त्यापैकी 2 हजार 900 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच, 1 हजार 112 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजवर आढळलेल्या एकूण रुग्णांपैकी 5 हजार 091 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. उपचाराधीन असलेल्या एकूण रुग्णांपैकी नागपूर, पुणे, ठाणे, औरंगाबाद, अकोला, सांगली आणि मुंबई मध्ये सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत. महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

म्युकरमायकोसीसचे सर्वाधिक सक्रिय रुग्ण असलेले जिल्हे
नागपूर – 497
पुणे – 454
औरंगाबाद – 302
ठाणे – 113
अकोला – 130
मुंबई – 380
सांगली – 109

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.