Maharashtra Corona Update : राज्यात 8,602 नवे रुग्ण ; 6,067 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज (बुधवारी) 8 हजार 602 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर, 6 हजार 067 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 61 लाख 81 हजार 247 एवढी झाली आहे.

आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना रुग्णांपैकी 59 लाख 44 हजार 801 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 96.17 टक्के एवढा झाला आहे. सध्या राज्यात 1 लाख 06 हजार 764 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्रात आज 170 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजवर 1 लाख 26 हजार 390 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.04 टक्के एवढा झाला आहे.

राज्यात आतापर्यंत 4 कोटी 46 लाख 09 हजार 276 नमूने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 80 हजार 771 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 4 हजार 309 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.