Pimpri News : वाढत्या महागाईविरोधात ‘बीआरएसपी’ची निदर्शने

एमपीसी न्यूज – घरगुती गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेलच्या महागाईविरोधात  बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. राज्य, केंद्र सरकारच्या विरोधात जाहीर निदर्शने केली.

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात शुक्रवारी झालेल्या निदर्शनात  आंदोलन पुणे ग्रामीण  अध्यक्ष  किरण साळवे, जिल्हाध्यक्ष धीरज बगाडे, पिंपरी – चिंचवडचे शहराध्यक्ष  बाळासाहेब भालेराव,  महिला आघाडीच्या रचना  जाधव, पंकज धेडे आदी सहभागी झाले होते.

आकाशाला भीडलेल्या पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस, सीएनजी, एलपीजी यांच्या किमती यामुळे प्रचंड वाढलेल्या महागाई मुळे राज्यातील नागरिक त्रस्त आहे. केंद्र सरकार राज्य सरकार मधील मंत्री आमदार खासदार मस्त आहेत. स्वतःलाच अनेक सवलती वाटून घेण्यामध्ये दंग आहेत. केंद्र राज्य सरकारने जनतेवर लादलेले अनेक जुलमी टॅक्स कमी करण्याची गरज असताना राज्य-केंद्र सरकारे निवडणुका सरकारी दौरे आमदार खासदारांच्या पेन्शन त्यांना बिनव्याजी कर्ज व्यवस्था अशा अनेक सोयी सवलतींचा वर्षाव करत आहेत.

ही राज्य व केंद्र सरकारसाठी शरमेची बाब आहे आणि त्यामुळेच पक्षातर्फे केंद्र व राज्य सरकारच्या अशा जनविरोधी धोरणाच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आल्याचे किरण साळवे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.