Pune News : पुण्यात मुळशी पॅटर्न; कोयत्याने कापला केक, 4 जण अटकेत

एमपीसी न्यूज : पुण्यातील कोंढवा भागात पुन्हा एकदा मुळशी पॅटर्नची झलक पाहायला मिळाली आहे. कोंढव्यात चार मुलांनी आपल्या वाढदिवसाचा केक चक्क कोयत्याने कापत परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे. एवढेच नाही तर या मुलांनी आपल्या केकवर कलम तीनशे वीस लिहून चक्क कायद्याला चॅलेंज केल्यासारखा केलं होतं. त्या चारही मुलांना  पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

वीरेंद्र बाजीराव सस्ते, शशांक श्रीकांत नागवेकर, समीर विश्वजीत खंडाळे, सुखविंदरसिंग पप्पुसिंग टाक अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून हे सर्व तरुण 18 ते 21 वर्षाचे असून हा सर्व प्रकार पुण्यातील मुंढवा भागात घडला आहे .

पोलीस कर्मचारी रमेश उगले यांनी या संदर्भात मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानूसार आरोपी वीरेंद्र सस्ते याच्या वाढदिवसानिमित्त समाजमाध्यमावर देखील असे अनेक व्हिडिओ व्हायरल करण्यात आले आहेत. हे सगळे आरोपी  मुंढव्यातील केशवनगर भागात राजमाता जिजाऊ चौकात सायंकाळी जमले. आणि त्यांनी आणि साथीदारांनी भरस्त्यात कोयत्याने केक कापून दहशत माजविली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर चौघांना अटक करण्यात आली. त्यांच्याबरोबर असलेले साथीदार पसार झाले असून चौघांना अटक करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.