Pune News : कोथरूडमध्ये गांजाची विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक, 21 किलो गांजा जप्त

एमपीसी न्यूज : पुणे पोलिस दलाच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने कोथरूड परिसरातील चैतन्य हेल्थ क्लब जवळून गांजाची विक्री करणाऱ्या तिघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून 21 किलो 200 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या या गांजाची किंमत चार लाख चोवीस हजार रुपये इतकी आहे. 

विष्णू उद्धव उपगंडलेवय (वय 29), आदित्य विलास पवार (वय 19) आणि प्रसाद महादेव केमसे (वय 19) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहे. कोथरूड पोलिस ठाण्यात त्यांच्या विरोधात एनडीपीएस एक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, अमली पदार्थ विरोधी पथकाचे कर्मचारी कोथरूड पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना रामबाग कॉलनी येथील चैतन्य हेल्थ क्लब जवळ काही इसम अमली पदार्थांची विक्री करणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी चैतन्य हेल्थ क्लब च्या प्रवेशद्वाराजवळील डाव्या भिंतीजवळ सापळा रचला. त्यानंतर त्या ठिकाणी आलेल्या एका टाटा टियागो कार ची झडती घेतली असता त्यांना त्यामध्ये मागच्या सीटच्या खाली एका पोत्यात गांजा सापडला. त्यातील विष्णू उद्धव उपगंडले हा सराईत गुन्हेगार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.