Pune News : शतपावली करणाऱ्या कर्नलच्या हातातील मोबाईल पळवला

एमपीसी न्यूज : रात्रीचे जेवण झाल्यानंतर शतपावली करणाऱ्या कर्नलच्या हातातुन अज्ञात चोरट्यांनी मोबाईल पळवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मुळा गेस्ट हाऊस समोरील सार्वजनिक रस्त्यावर हा प्रकार घडला.

कर्नल तेजिंदर कुमार थापर (वय 58) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 18 एप्रिलच्या रात्री ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कर्नल आहेत. सोमवारी रात्री जेवण केल्यानंतर ते शतपावली करण्यासाठी मुळा गेस्ट हाऊस समोर सार्वजनिक रस्त्यावर आले होते. यावेळी रस्त्याने जात असताना दुचाकीने त्यांच्याजवळ आलेल्या दोन अनोळखी व्यक्तीने त्यांच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून चोरून नेला आहे. खडकी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

 

 

 

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.