Delhi News : दोन दिवस भारत बंदचे आवाहन; बँकेचे कर्मचारीही होणार सहभागी

एमपीसी न्यूज – ट्रेड युनियनने केंद्र सरकारच्या धोरणांच्या विरोधात दोन दिवस भारत बंदची हाक दिली आहे. यामध्ये बँक संघटनांनी देखील सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. बँक कर्मचा-यांसोबत कोळसा, स्टील, तेल, दूरसंचार, पोस्ट, विमा विभागांशी संबंधित कर्मचारी देखील सहभागी होणार आहेत.

सरकारी बँकांचे खाजगीकरण, बँकिंग अधिनियम 2021 या मुद्दयांना आधार बनवत बँका सहभागी होणार आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाने 28-29 मार्च रोजी बँकांचे कामकाज प्रभावित राहील, अशी सूचना ग्राहकांना दिली आहे.

केंद्र सरकारची धोरणे कामगार विरोधी असल्याचे सांगत सेंट्रल ट्रेंड युनियनच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि 28) आणि मंगळवारी (दि. 29) भारत बंदची हाक देण्यात आली आहे. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने या बंदला पाठिंबा दिला आहे.

केंद्र सरकारची धोरणे कामगार, शेतकरी, नागरिक आणि देशाच्या विरोधात असल्याचे सांगत हा बंद केला जाणार आहे. सरकारने सन 2021 च्या बजेटमध्ये आणखी दोन सरकारी बँकांचे खाजगीकरण करण्याची घोषणा केली. बँकांचे खाजगीकरण होत असल्याबाबत बँक कर्मचारी विरोध दर्शवणार आहेत.

कोळसा, स्टील, तेल, दूरसंचार, पोस्ट, विमा या विभागातील कर्मचारी देखील या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. रेल्वे आणि सुरक्षा विभागातील कर्मचारी देखील या मोहिमेत जोडले गेले असल्याचे म्हटले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.