Pune : पुण्याचा पारा वाढला; विदर्भात उष्णतेच्या लाटेचा अंदाज

एमपीसी न्यूज – पुणे शहर परिसरात उन्हाचा जोर वाढला आहे. या महिन्यात सरासरीच्या तुलनेत 1.2 अंश सेल्सियसने पारा वाढला आहे. पुणे हवामान विभागाने विदर्भात सोमवार (दि. 28) ते बुधवार (दि. 30) या कालावधीत विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे.

पश्चिम विदर्भात व कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. तर विदर्भाच्या उर्वरित भागात व मराठवाड्याच्या काही भागात किंचीत वाढ झाली आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठीकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचीत घट झाली आहे.

विदर्भात काही ठीकाणी न मध्य महाराष्ट्रात तुरळक ठीकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. मराठवाड्यात ब-याच ठीकाणी व कोकण गोव्यात तुरळक ठीकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे.

सोमवार ते बुधवार या तीन दिवसात कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

ऊन तापल्याने उकाडा वाढू लागला आहे. शरीरातून घामाच्या धारा वाहत आहे. नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे. भरपूर पाणी प्यावे व योग्य आहार घ्यावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.