Illegal Hand Furnace : अवैध हातभट्टी बंद करण्यासाठी मोहिम राबवा – मंत्री शंभूराज देसाई

एमपीसी न्यूज : जिल्ह्यातील अवैध हातभट्टीच्या (Illegal Hand Furnace) माध्यातून होणारी मद्यविक्री संपूर्णपणे बंद करण्यासाठी मोहिम राबवावी, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

शासकीय विश्रामगृह येथे आयोजित राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागीय उपायुक्त अनिल चासकर, अधीक्षक चरणसिंह राजपूत, उपअधीक्षक संजय पाटील, युवराज शिंदे आदी उपस्थित होते.

E-Shram : असंघटित कामगारांना ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

देसाई म्हणाले, जिल्ह्यातील अवैध हातभट्टीच्या (Illegal Hand Furnace) माध्यामातून होणारी मद्यविक्री बंद करुन संबंधितावर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करा. कार्यवाही करताना पोलीस विभागाची मदत घेण्यात यावी. परराज्यातून होणारी अवैध मद्यवाहतूक रोखण्याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी केल्या. पोलीस विभागाप्रमाणे अवैध दारू व्यवसायाला प्रतिबंध घालण्यासाठी सूत्रांची मदत घेण्याबाबत विचार करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी अधीक्षक चरणसिंह राजपूत यांनी बैठकीत विभागाची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. बैठकीत दिलेल्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.