Chinchwad News : दुकानावर कब्जा केला म्हणून लहान भावाविरुद्ध गुन्हा दाखल 

एमपीसी न्यूज – मोठ्या भावाने चालविण्यासाठी दिलेल्या दुकानावर लहान भावाने कब्जा करत बनावट कागदपत्रांच्या आधारे वीज कनेक्शन घेतले. (Chinchwad News) महापालिकेत बनावट कागदपत्रे सादर करून स्वतःच्या नवे नळ कनेक्शन घेतले. याप्रकरणी लहान भावावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सन 2018 ते सन 2019 या कालावधीत गावडे कॉलनी, चिंचवड येथे घडली.

मारुती आबा सुपेकर (वय 70, रा. गावडे कॉलनी, चिंचवड) यांनी याप्रकरणी रविवारी (दि. 22) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिल आबा सुपेकर (वय 65 रा. गावडे कॉलनी, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मारुती यांच्या जागेत त्यांनी लहान दुकान सुरु करून ते त्यांचा लहान भाऊ अनिल यांना चालविण्यासाठी दिले. (Chinchwad News) दरम्यान अनिल यांनी महापालिकेच्या कर संकलन विभागात खोटे कागदपत्र व प्रतिज्ञापत्र सादर करून त्या दुकानात स्वतःच्या नावे नळ कनेक्शन घेतले.

Pimpri Chinchwad : सोशल हॅंड्स फाउंडेशनकडून शहीद जवानांच्या वीरपत्नींचा सन्मान

तसेच बनावट कागदपत्रे व प्रतिज्ञापत्र सादर करून वीज कनेक्शनही घेतले. याप्रकरणी त्यांनी मारुती यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.