Chakan : उघड्या दरवाज्यावाटे एका तासात घरातील दागिने व रोख रक्कम चोरीला

एमपीसी न्यूज – उघड्या दरवाजे वाटे अवघ्या एक तासात सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीला ( Chakan) ही घटना शनिवारी (दि.24) चाकण येथील राणूबाईमळा परिसरात दुपारी पाच ते सहा या कालावधीत घडली आहे.

Pune : मित्र महोत्सवा’त रसिकांना मिळाली विविध रागरूपांची सुरेल अनुभूती

या प्रकरणी महिलेने रविवारी (दि.25) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  फिर्यादी महिला यांच्याकडून घराचा  दरवाजा अर्धवट उघडा राहिला होता.  यावेळी चोराने दरवाजावाटे घरात प्रवेश करत घरातील सोन्याचे दागिने व रोख ,रक्कम मोबाईल असा एकूण 67 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. यावरून चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस चोराचा शोध घेत ( Chakan) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.