Job Fraud: परदेशातील नोकरीच्या आमिषाने तरुणाची साडे तीन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज : परदेशात नोकरी लावण्याच्या आमिषाने दोघांनी मिळून एका तरुणाची तीन लाख 49 हजार रुपयांची फसवणूक केली. (Job Fraud) हा प्रकार 15 मे ते 22 ऑक्टोबर या पाच महिन्याच्या कालावधीत मेदनकरवाडी,चाकण येथे घडला.मात्र अद्यापही नोकरी न लावल्याने पोलीसात याबबत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सुशील राहुल येवले (वय 22, रा. आंबेठाण चौक, चाकण) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. 13) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विठ्ठल ज्ञानू कोळी (वय 50, रा. उपरी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर), अजित गीते उर्फ प्रदीप दत्तात्रय बेरड (वय 34, रा. दरेवाडी, ता. जि. अहमदनगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri Crime: विवाहितेला मारहाण करत भावाला जीवे मारण्याची धमकी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी येवले यांना जर्मनी येथे नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. त्यातून वेगवेगळ्या कारणांसाठी येवले यांच्याकडून ऑनलाईन माध्यमातून तीन लाख 49 हजार रुपये घेतले. पैसे घेऊन त्यांना नोकरी न लावता त्यांच्याकडून घेतलेल्या पैशाचा आरोपींनी अपहार केला.(Job Fraud) आरोपी प्रदीप बेरड याने अजित रामदास गीते असे खोटे नाव येवले यांना सांगितले.अजित रामदास गीते नावाचे बनावट आधारकार्ड बनवून ते येवले यांना पाठवून फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. य़ा घटनेटचा चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.